तैपेई ( तैवान ) : अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानहून निघाल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी राजधानी तैपेई येथे तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅन्सी पेलोसीचा पुढचा थांबा दक्षिण कोरिया असेल. दरम्यान या भेटीमुळे दक्षिण आशियात मोठा तणाव निर्माण झाला आहे. ( Nancy Pelosi leaves from Taiwan ) ( US House Speaker Nancy Pelosi ) ( Nancy Pelosi Taiwan Visit )
त्याचवेळी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे नाराज झालेल्या चीनने अमेरिकेच्या राजदूताला बोलावून या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आपल्या चुकांची किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल, असा इशारा चीनने दिला आहे.