बैरुत - लेबनान येथील बैरुत स्फोटाप्रकरणी बैरुत बंदरावरील १६ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या स्फोटात 100 हून अधिक नागरिकांचा जीव गेला, तर हजारहून अधिक जखमी झाले आहेत. लेबनानच्या सरकारी वृत्त संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
बैरुत स्फोट प्रकरणी 16 जण ताब्यात, 100 जणांचा गेला होता बळी
नॅशनल न्यूज एजेंसी’ ने दिलेल्या माहितीनुसार, सैन्य दलाच्या न्यायिक विभागाचे सरकारी आयुक्त फदी अकीकी म्हणाले की, या स्फोटाप्रकरणी गुरुवारी 18 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. हे सर्व बंदर आणि सीमा शुल्क विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत.
नॅशनल न्यूज एजेंसी’ ने दिलेल्या माहितीनुसार सैन्य दलाच्या न्यायिक विभागाचे सरकारी आयुक्त फदी अकीकी म्हणाले की, या स्फोटाप्रकरणी गुरुवारी 18 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. हे सर्व बंदर आणि सीमा शुल्क विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत. तसेच तब्बल 2750 टन अमोनियम नायट्रेट या स्फोटक पदार्थाचे साठा ज्या ठिकाणी करण्यात आला होता, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जाच्याकडे होती त्याचीही चौकशी केली जाणार आहे.
अकिकी यांनी मंगळवारी स्फोटानंतर तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तसेच या प्रकरणातील सर्व संशयितांची तपास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले