वॉशिंग्टन (अमेरिका): येथील भारतीय दूतावासासमोर खलिस्तान समर्थकांचा एक गट जमला आणि त्यांनी हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. परंतु यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे लंडन आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील मिशनमध्ये झालेल्या घटनांची पुनरावृत्ती रोखली गेली. शनिवारी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाजवळ फुटीरतावादी शीख जमा झाले आणि त्यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना शिवीगाळ केली आणि जाहीरपणे धमकी दिली. आंदोलनाच्या वेळी संधू दूतावासात नव्हते.
सुरक्षा सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घेतली धाव-निषेधाच्या ठिकाणी काही आंदोलक इतर आंदोलकांना हिंसाचारात सामील होत इमारतीच्या खिडक्या आणि काचा फोडताना दिसले. गोष्टी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात या शक्यतेने, अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक पोलिसांनी त्वरीत अतिरिक्त सैन्य तैनात केले आणि किमान तीन पोलिस व्हॅन दूतावासाच्या समोर उभ्या होत्या. एका क्षणी, पाच आंदोलकांनी पटकन रस्ता ओलांडला आणि तिरंगा फडकवण्यात आलेल्या दूतावासाच्या खांबाजवळ पोहोचले, परंतु सिक्रेट सर्व्हिसचे कर्मचारी ताबडतोब तेथे पोहोचले आणि त्यांना निदर्शनासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी जाण्यास सांगितले.
भारतीय मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न-सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावास आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील भारतीय मालमत्तेचे नुकसान करण्याच्या इराद्याने आंदोलक आले होते. पीटीआयच्या एका पत्रकाराने फुटीरतावाद्यांना दूतावासाच्या समोर महात्मा गांधी पुतळ्याजवळ बागेत ठेवलेल्या लाकडी काठ्यांचे दोन बंडल आणताना पाहिले. निषेध करणाऱ्या आंदोलकांनी भारतीय पत्रकारांनाही अरेरावी केली. त्यांनी पत्रकाराला कॅमेऱ्यासमोर येऊन खलिस्तानचा झेंडा चेहऱ्यावर लावून अडवणूक तर केलीच, शिवाय धक्काबुक्कीही करत गंभीर परिणामांची धमकीही दिली.
आंदोलकांनी केली पत्रकाराला शिवीगाळ-आंदोलकांपैकी एकाने पत्रकाराला शिवीगाळ करत प्रश्न विचारत होता की, तुम्ही मला सांगा की तुम्ही काय तक्रार करणार आहात? निदर्शकांकडून हाल होण्याची शक्यता लक्षात घेता पत्रकाराने पोलिसांकडे तक्रार केल्याने निदर्शक निघून गेले. काही वेळाने आंदोलकांपैकी दोघे सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांजवळ उभे असलेल्या पत्रकारांच्या दिशेने आले. दुसऱ्या निदर्शकाने रिपोर्टरला शिवीगाळ केली, असंसदीय शब्द वापरले, आणि त्याच्या हातात असलेले दोन खलिस्तानचे झेंडे अशा प्रकारे हलवले की त्याच्या काठ्या रिपोर्टरच्या डाव्या कानाला लागल्या.
हेही वाचा: खलिस्तानवादी अमृतपाल सिंगला आता पकडायचंय, लावले पोस्टर्स