महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2020, 12:32 PM IST

ETV Bharat / international

जगभरात 1 कोटी 36 लाख 81 हजार 365 जणांना संसर्ग

अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 36 लाख 81 हजार 365 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 86 हजार 128 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 80 लाख जण रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे.

जागतिक कोरोना अपडेट
जागतिक कोरोना अपडेट

वॉशिंग्टन डी. सी - चीनमधील वुहान प्रांतातून कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरवात झाली होती. त्यानंतर विषाणू झपाट्यानं जगभरात पसरला. विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 34 हजार 11 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 852 जणांचा मृत्यू झाला आहे.

अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 36 लाख 81 हजार 365 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 86 हजार 128 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 80 लाख जण रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत गेल्या 24 तासांत 67 हजार 632 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढून आले आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36 लाख 15 हजार 991 ऐवढी असून 1 लाख 40 हजार 101 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये 19 लाख 70 हजार 909 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 75 हजार 523 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये आतापर्यंत 9 लाख 68 हजार 876 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जगभरामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जगावर आरोग्य आणीबाणी आली असून अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details