महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इंग्लडने इराणच्या हवाई हल्ल्याचा केला निषेध, पुन्हा हल्ला न करण्याचे केले आवाहन

इराकमधील लष्करी तळावर इराणने केलेल्या हल्ल्याचा इंग्लडने निषेध केला आहे. पुन्हा असा बेपर्वाईने गंभीर हल्ला करू नका, अशी विनंती इंग्लडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉमिनीक राब यांनी इराणला केली आहे.

By

Published : Jan 8, 2020, 2:16 PM IST

डॉमिनीक राब
डॉमिनीक राब

लंडन - इराकमधील लष्करी तळावर इराणने केलेल्या हल्ल्याचा इंग्लडने निषेध केला आहे. पुन्हा असा बेपर्वाईने गंभीर हल्ला करू नका, अशी विनंती इंग्लडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉमिनीक राब यांनी इराणला केली आहे.

इराकमधील अमेरिकेच्या सहयोगी सैन्याबरोबर इंग्लड, नॉर्वे, डेनमार्कचे सैन्यही तेथे आहे. त्यामुळे आणखी तणाव वाढण्यापासून इराणला परावृत्त करण्याचा प्रयत्न इंग्लडने केला आहे. तणाव निवळण्यासाठी पाऊले उचलण्याचे आवाहन इंग्लडने इराणला केले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इराणने दहा ते बारा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर डागले. यामध्ये अल-अस्साद आणि इरबील या तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ८० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details