नूर सुलतान -कझाकिस्तानमध्ये १०० प्रवासी नेणारे विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हे विमान कोसळले.
या विमानात ९५ प्रवासी आणि पाच कर्मचारी होते. या अपघातात आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६६ लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. विमानाची परिस्थिती पाहता, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवासी नेणारे विमान कोसळले बेक एअर कंपनीचे 'फ्लाईट २१००' हे विमान कझाकिस्तानच्या अल्माटी विमानतळावरून उड्डाण घेत होते. उड्डाणानंतर सकाळी ७.०५ वाजता हे विमान रडारवरून गायब झाले. त्यानंतर काही वेळातच ते एका दुमजली इमारतीला जाऊन धडकले. सध्या मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. तर, रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे, तेथील लोकांनाही दुसरीकडे हलवण्याचे काम सुरु आहे.
या दुर्घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने फोक्कर-१०० प्रकारातील सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. बेक एअर कंपनी ही अल्माटी ते नूर-सुलतान पर्यंतच्या प्रवासासाठी याप्रकारच्या विमानांचा वापर करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : चीन, रशिया अन् इराणमध्ये होणार संयुक्त नौदल सराव