लंडन -येथील 'दि लैन्सेट' या मासिकाने प्रकाशित केलेल्या लेखात फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) ही लस भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या डेल्टा (बी.1.617.2) स्ट्रेनवर कमी प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती कमी निर्माण करते. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नव्या डेल्टा स्ट्रेनविरुद्ध लढण्याची क्षमता ही मागच्या बी.1.1.7 या स्ट्रेनच्या तुलनेत कमी आहे, असा दावा करण्यात आला आहे.
बी.1.1.7 (अल्फा) या स्ट्रेनच्या तुलनेत कमी परिणामकारक -
लेखात त्यांनी असे म्हटले आहे की, शरीराला या व्हायरसची ओळख पटेपर्यंत त्याविरोधी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती वाढत्या वयानुसार कमी होत जाते. त्याचा स्तर हा काही काळानंतर खालावत जातो. फायझर-बायोएनटेक या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाच्या नव्या डेल्टा (बी.1.617.2) स्ट्रेनविरुद्ध लढण्याची क्षमता ही मागच्या बी.1.1.7 (अल्फा) या स्ट्रेनच्या तुलनेत कमी आहे.