काबुल-अफगाणिस्तानामध्ये तालिबान्यांनी पाच दिवसात केलेल्या विविध स्फोटात ५८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण जखमी झाले आहेत. हे स्फोट २३ ते २७ ऑक्टोबरदरम्यान विविध चार प्रांतात झाल्याचे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
एका माध्यमाच्या सर्वेक्षणानुसार काबुल, गझनी, खोस्ट आणि झाबुल प्रांतामध्ये झालेल्या स्फोटांमध्ये नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यामधील एक अपघात काबुलमधील क्लासेसजवळ शनिवारी झाला आहे. यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. तर ७७ जणांचा स्फोटात मृत्यू झाला. खोस्ट प्रांतामध्ये मंगळवारी सात हल्लेखोरांनी स्फोटके भरून आणलेल्या वाहनांनी स्फोट घडवून आणला. यामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाले आहेत. तर याचदिवशी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले आहेत.