स्पेनच्या इतिहासातील हे सर्वात भयंकर असे आरोग्य संकट आहे. वृद्ध आणि मध्यमवयीनच नव्हे तर, अगदी तरूण लोकही कोविड-१९च्या संसर्गाने बाधित होत आहेत. १० ते १४ दिवसांच्या उपचारांनंतर, तरूण लोक चांगले बरे होत आहेत. तरूण लोकांमध्ये मृत्युचे प्रमाण कमी आहे-एथेल सेक्विरा, कोविड-१९च्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या एक स्पॅनिश डॉक्टर इथेल कॅसानोव्हा, स्पेन येथील प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रात डॉक्टर म्हणून काम करतात. त्या आंतरराष्ट्रीय आरोग्य सहकारी संघटनेच्या समन्वयक आहेत. २००० ते २००८ पर्यंत, त्यांनी आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील ग्रामीण विकास विश्वस्त येथे डॉक्टर म्हणून काम केले आहे. ईनाडूशी बोलताना त्यांनी स्पेनच्या सध्याच्या स्थितीविषयक भाष्य केले.
संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले आहे. आणिबाणी असल्याशिवाय, कुणीही बाहेर पडण्याचे धाडस करत नाही. कोविड-१९ च्या परिक्षेत ३६ हजार लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यापैकी, १३,५०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. चीनमध्ये वयस्कर व्यक्ती एनसीओव्ही संसर्गाला जास्त प्रवण आहेत, तर स्पेनमध्ये तरूणांमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जास्त दिसते आहे. सरकार व्यापक प्रमाणात चाचण्या करत आहे. नव्या कोरोनाविषाणुच्या लक्षणे असलेल्या लोकांना घरातच क्वारंटाईन केले असून वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. ७० टक्के प्रकरणांमध्ये, प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रातील डॉक्टर्स कॉलवरून आणि ऑनलाईन पद्धतीने तपासणी करत आहेत. अगदी डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही वारंवार प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. शक्य तितक्या थेट शारिरिक संपर्काशिवाय संसर्गग्रस्त कुटुंबांवर उपचार केले जात आहेत. केवळ तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयांत हलवले जात असून, आयसीयूमध्ये ठेवण्यात येत आहे. श्वसनाला त्रास होत असल्यास त्यांना व्हेंटिलेटरचा आधार दिला जात आहे. रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या किंवा व्हेंटिलेटरचा आधार घेतलेल्या रूग्णांची संख्या खूप कमी आहे. देशाने आतापर्यंत अशी परिस्थिती कधीच पाहिलेली नाही. अगदी तरूण लोकांनाही १४ दिवसांसाठी रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे. यावरून या महामारीच्या प्रमाणाची कल्पना येते.