रोम (इटली) -इटालियन पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी देशवासियांना कोरोनापासून स्व:ताचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुसरी टाळेबंदी नको असल्यास आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शुक्रवारी नॅशनल कौन्सिल ऑफ लेबर कन्सल्टंट्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना संबोधित करताना कॉन्टे म्हणाले की, आज संपूर्ण युरोप आणि इटलीमध्ये संक्रमणाच्या वाढीमुळे चिंता वाढली आहे.
संसर्ग रोखणे, उत्पादन व कामकाज सुरू ठेवणे, शाळा व सार्वजनिक कार्यालये बंद होण्यापासून वाचवणे हेच आमचे ध्येय आहे. मात्र, जनतेच्या सतर्कतेशिवाय हे होणे शक्य नाही. दुसरी टाळेबंदी रोखण्यासाठी आपण जागरूक असले पाहिजे, असे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे म्हणाले.