- चीन आणि चीनमधील बीजिंग, शांघायसह अनेक ठिकाणी नववर्ष २०२० चे स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी संगीतावर ताल धरला होता.
- हाँग काँगमध्ये रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शहर उजळून गेले.
- उत्तर कोरियामध्ये नववर्ष २०२० चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
- न्यूझीलंडमध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले.
- सिडनी, ऑस्ट्रेलियामध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईमध्ये नागरिकांनी नववर्षाचे स्वागत केले.
- दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व नागरिक एकत्र आले होते.
- तैवानमध्ये नागरिकांनी नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले.
- बँकॉकमध्ये नागरिकांनी तसेच, पर्यटकांनी एकत्र येत ३१ डिसेंबरच्या रात्री १२ चे ठोके पडताच जोरदार जल्लोष केला.
- दुबईमध्ये नागरिकांनी आणि पर्यटकांनी एका सुरात १० ते ० अशी उलटी गिनती करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
- रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले होते. येथे नागरिकांनी आणि पर्यटकांनी एकत्र येत नवीन वर्षाचे स्वागत केले.
VIDEO : नव वर्ष 2020 च्या स्वागतासाठी जगभरात जल्लोष, पाहा काही क्षणचित्रे
जगभरात सर्वच ठिकाणी नववर्ष २०२० चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईमध्ये सर्व जगभरात जोरदार उत्सव साजरा झाला. २०२० हे लीप वर्ष असून या वर्षात ३६६ दिवस असतात. लीप वर्ष ४ वर्षांतून एकदा येते.
नव वर्ष 2020