मनिला - फिलिपाईन्समध्ये चक्रीवादळ मोलावेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे. तर, चार जण बेपत्ता आहेत आणि 39 लोक जखमी आहेत. सरकारी आपत्ती निवारण संस्थेने शुक्रवारी ही माहिती दिली. लवकरच आणखी एक वादळ फिलिपाईन्सच्या जवळ वेगाने येत असल्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.
नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट कौन्सिलने (एनडीआरआरएमसी) दिलेल्या माहितीनुसार, फिलिपाईन्सवर यावर्षी आदळलेले हे 17 वे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. या वादळामुळे लुझोन आणि मध्य फिलिपाईन्स, सिन्हुआ या मुख्य बेटांवरील 7 प्रांतातील 7 लाख 75 हजार 513 पेक्षा जास्त लोकांना विस्थापित व्हावे लागले.
एनडीआरआरएमसीने सांगितले की, 16,000 हून अधिक बाधित लोक एकतर 150 निर्वासन केंद्रात किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत राहात आहेत. जोरदार वारा आणि पावसामुळे पिकांचे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे संस्थेने म्हटले आहे. रविवारी रात्रीपासून मोलावेने देशाच्या पूर्व किनारपट्टीवर जोरदार थैमान घातले आहे. यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले आणि अनेक झाडे आणि वीजेच्या तारा, खांब कोसळले.
हेही वाचा -फ्रान्सची द्वेषयुक्त ट्वीटबद्दल महाथिर यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी