काबूल - अफगाणिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला तर, १०० जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान काबूल शहराच्या दारुलमन भागात बॉम्बस्फोट झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने लग्न समारंभामध्ये स्वत:ला उडवून दिले, असे वृत्त एएनआय वृत्त संस्थेने दिले आहे.
अफगाणिस्तानमध्ये लग्न समारंभामध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट; ४० ठार, १०० जखमी
अफगाणिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तान सरकारने बॉम्बस्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लग्न समारंभावेळी पूर्ण सभागृह लोकांनी खचाखच भरलेले होते. त्याचवेळी एका व्यक्तीने स्वत:ला उडवून दिले, यानंतर जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले.
आत्मघाती हल्लेखोराने पुरुषांच्या कक्षामध्ये प्रवेश करत स्वत:ला उडवून दिले. यामध्ये मृत आणि जखमींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांना हल्लेखोराने लक्ष केले, असे बिलाल सर्वर्या या स्थानिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने सांगितले. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.