मॉस्को - हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अलास्का तटाजवळ उड्डान केले. यावेळी अमेरिकेच्या अत्याधुनिक एफ -22 लढाऊ विमानांनी रशियन बॉम्बर विमानांचा मार्ग रोखला, असे एनओआरएडीकडून सांगण्यात आले. शीत युद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि रशियाच्या संबंधात कटुता आल्यांनंतर दोन्ही देशाकडून एकमेकांच्या अगदी जवळ सिमेवर लष्करी सराव करण्यात येतो.
11 तासांच्या मोहिमेदरम्यान चार टीयू-95 लढाऊ विमानांनी दक्षिण रशियाच्या लगतचा पूर्वेकडील ओखोटस्क समुद्र, बेरिंग समुद्र, चुक्ची समुद्र आणि उत्तर पॅसिफिकवर उड्डाण केले. रशियन लाँग-रेंज एव्हिएशनचे कमांडर लेफ्टनंट जनरल सर्गेई कोब्येलाश यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल लढाऊ विमानांच्या दलाचे कौतुक केले. तसेच एसयू -35 आणि मिग -११ लढाऊ विमानांनी बॉम्बरला बाहेर काढल्याचे ते म्हणाले.