महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

एफएफटीच्या बैठकीनंतर दहशतवादी हाफिज सईदची तरुंगातून होईल सुटका, सूत्र

पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायलयाने दिलेल्या निकालाविरोधात लाहोर उच्च न्यायालयात आवाहन देणार असल्याचे हाफिज सईदच्या वकिलाने सांगितले आहे. त्यामुळे हा खटला वरिष्ठ न्यायालयात टिकेल की नाही, हे लवकरच समजणार आहे.

हाफिज सईद, hafiz saeed
हाफिज सईद

By

Published : Feb 15, 2020, 7:48 PM IST

इस्लामाबाद - कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) बैठकीनंतर सोडून देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने हाफिज सईदला दोषी ठरवत साडेपाच वर्षांची शिक्षा नुकतीच सुनावली आहे.

पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात लाहोर उच्च न्यायालयात आवाहन देणार असल्याचे हाफिज सईदच्या वकिलाने सांगितले आहे. त्यामुळे हा खटला वरिष्ठ न्यायालयात टिकेल की नाही, हे लवकरच समजणार आहे.

हाफिज सईद विरोधात चालवण्यात आलेल्या खटल्यामध्ये अनेक पळवाटा असून त्यामुळे हा खटला टिकणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई दहशतवादी हल्ला आणि उरी लष्करी तळावरील हल्ल्याचा हाफिज सईद सूत्रधार होता. याबरोबरच काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. सईद लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून त्याने अनेक बिगर सहकारी संस्थांमार्फत पैसा उभा करून दहशतवादासाठी वापरल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

'फायनान्शिअल अ‌ॅक्शन टास्क फोर्स' या संघटनेद्वारे पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकण्यात आले आहे. दहशतवादी कारवायांसाठी अवैध मार्गाने पाकिस्तानमधून पैसा पुरवला जात आहे. मात्र, पाकिस्तान ही मदत रोखण्यास अपयशी ठरल्याचे म्हणत पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, दहशवाद्यांविरोधात कारवाई करत असल्याचा देखावा करण्यासाठीच पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे, असे बोलले जात आहे. जर पाकिस्तानला आगमी बैठकीत एफएएफटीच्या ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात आले तर हाफिज सईदला पुन्हा सोडून देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय दबावामुळेच पाकिस्तानने ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details