महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 31, 2019, 11:04 AM IST

Updated : Oct 31, 2019, 11:13 AM IST

ETV Bharat / international

पाकिस्तान : तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, ६५ जणांचा होरपळून मृत्यू

तेजग्राम एक्स्प्रेसला लियाकतपूरजवळ भीषण आग. आगीत ६५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, १३ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर उशिरा ही आग लागली, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे.

तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग

लियाकतपूर :कराची-रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला लियाकतपूरजवळ भीषण आग लागली. या आगीत ६५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, १३ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर उशिरा ही आग लागली, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे.

लियाकतपूरजवळील रहीम यार खानजवळ आग लागली. आगीत रेल्वेचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. ही रेल्वे कराची स्थानकातून निघून लाहोरच्या दिशेने जात होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Oct 31, 2019, 11:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details