महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अफगाणिस्तानात निवडणुकीपूर्वी दुहेरी बॉम्बस्फोट, 48 ठार

'आम्ही लोकांना आधीच इशारा दिला होता की, निवडणुकीच्या रॅलीसाठी जाऊ नका. तेथे गेल्यामुळे काही नुकसान झाल्यास यासाठी ते स्वतःच जबाबदार राहतील,' असे मुजाहिद याने म्हटले आहे. परवान रुग्णालयाचे संचालक अब्दुल कासिम संगीन यांनी मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले आहे.

अफगाणिस्तान

By

Published : Sep 18, 2019, 11:05 AM IST

Updated : Sep 18, 2019, 11:45 AM IST

काबूल - अफगाणिस्तानमधील निवडणुकीपूर्वी राजधानी काबूल आणि परवान प्रांतात मंगळवारी झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यांत 48 जण ठार झाले.

पहिला स्फोट मध्य परवान प्रांतात झाला. येथे राष्ट्रपती अब्दुल गणी यांची रॅली सुरू होती. हल्लेखोर मोटरसायकलवरून रॅलीच्या ठिकाणी आले. त्यांनी तेथील जवळच्या पोलीस चौकीमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवून आणला. यात 26 जण ठार आणि 42 जण जखमी झाले.

हेही वाचा - 'तुमच्या देशातील अल्पसंख्याकांच्या छळाविषयी बोला'; भाजप खासदाराची मलालावर आगपाखड

या घटनेच्या एका तासानंतर मध्य काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला. याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. या स्फोटात 22 जण ठार झाले तर, 38 जण जखमी झाले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला तालिबानसह समझौत्याची चर्चा रद्द केली होती. यानंतर हे बॉम्बहल्ले सुरू झाले आहेत. या समझौत्यानुसार, अमेरिकतर्फे अफगाणिस्तानातील आपले सैन्य टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार होते.

अफगाणिस्तानात निवडणुकीपूर्वी दुहेरी बॉम्बस्फोट, 48 ठार

तालिबानने मीडियाला पाठवलेल्या एका पत्रातून या दोन्ही बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीहउल्ला मुजाहिद याने गणी यांच्या रॅलीजवळ जाणीपूर्वक स्फोट घडवून आणल्याचे म्हटले आहे. याद्वारे 28 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकांमध्ये अडचणी उत्पन्न करण्याचे उद्देश असल्याचे त्याने म्हटले आहे.

'आम्ही लोकांना आधीच इशारा दिला होता की, निवडणुकीच्या रॅलीसाठी जाऊ नका. तेथे गेल्यामुळे काही नुकसान झाल्यास यासाठी ते स्वतःच जबाबदार राहतील,' असे मुजाहिद याने म्हटले आहे. परवान रुग्णालयाचे संचालक अब्दुल कासिम संगीन यांनी मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्राला विनंती

परवान प्रांतात ज्या वेळी हा हल्ला झाला, तेव्हा राष्ट्रपती गणी आपल्या समर्थकांना संबोधित करत होते. मात्र, ते सुरक्षित आहेत. 'या घटनेवरून तालिबानला शांततेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे,' असे गणी यांनी हल्ल्याचा निषेध करताना म्हटले आहे.

Last Updated : Sep 18, 2019, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details