महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिला

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, गेल्या सोमवारीच शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाची 8 वर्षे पूर्ण केली आहेत.

शिंजो आबे
शिंजो आबे

By

Published : Aug 28, 2020, 12:04 PM IST

Updated : Aug 28, 2020, 2:35 PM IST

टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची प्रकृती अस्वस्थ असून त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. याबाबत आज शिंजो आबे औपचारिक घोषणा केली. एका आठवड्यात त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, गेल्या सोमवारीच शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाची 8 वर्षे पूर्ण केली आहेत. शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणारे पंतप्रधान आहेत. डिसेंबर 2012 मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला. ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले आहे. आबे यांची पंतप्रधान पदाची मुदत सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. आबे यांनी जास्त काळ पदावर राहून इसाकू सातो यांचा विक्रम मोडला आहे.

आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र असून आबे आणि मोदींच्या काळामध्ये भारत आणि जपानमधील संबंध अधिक सदृढ झाल्याचे म्हटले जाते. नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात पुढील महिन्यात द्विपक्षीय शिखर परिषद होणार होती. मात्र, शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्याने आता जपानच्या पंतप्रधानपदी कोण आरूढ होईल, हे भारतासाठी म्हत्त्वाचे आहे.

Last Updated : Aug 28, 2020, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details