महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोनाविषयी सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या डॉक्टरचाच कोरोनाने मृत्यू

कोरोना विषाणूची सर्वात अगोदर माहिती देवून इतरांना सतर्क करणाऱ्या चीनमधील डॉक्टराचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ली वेनलिंग
ली वेनलिंग

By

Published : Feb 6, 2020, 10:40 PM IST

Updated : Feb 6, 2020, 11:32 PM IST

बीजिंग (चीन) - जगामध्ये भीती पसरवलेल्या कोरोना विषाणूची सर्वात अगोदर माहिती देवून इतरांना सतर्क करणाऱ्या चीनमधील डॉक्टरचाच गुरुवारी कोरोनाच्या साथीमुळे मृत्यू झाला आहे. ली वेनलिंग (वय ३४) असे त्या डॉक्टरचे नाव आहे. चीनमध्ये सुरुवातीच्या काळात याप्रकारच्या विषाणूमुळे साथ पसरली असल्याचे सांगणाऱ्या आठ डॉक्टरांपैकी ते एक महत्त्वाचे डॉक्टर होते.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये जेव्हा हा व्हायरस आला, त्यावेळी या डॉक्टरांनी प्रथम त्या विषयी अहवाल दिला होता. गुरुवारपर्यंत या विषाणूमुळे चीनमध्ये एकूण ५६४ जणांचा मृत्यू झाला असून ३१ प्रातांमधील जवळपास २८ हजार १८ लोकांना त्याची लागण झाल्याची माहिती आहे.

चीनमधील लोकप्रिय मेसेजिंग अ‌ॅप वुई चॅटवर त्यांनी आपल्या मेडिकल स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये एक मेसेज पाठवला होता. स्थानिक सीफूड मार्केटमधील ७ रुग्णांना 'एसएआरएस' सदृश आजाराचे निदान झाले असून त्यांना रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले आहे. याविषयी त्यांनी आपल्या मित्रांना आणि जवळच्या नातेवाईकांना याची माहिती दिली होती. मात्र, काही वेळातच त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल झाले, त्यामध्ये या डॉक्टरांच्या नावाचा उल्लेख नव्हता.

ली यांनी मेसेज पोस्ट केल्यावर लगेचच वुहान पोलिसांनी अफवा पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता. प्रशासन ही रोगाची साथ असल्याचे सुरुवातीला मान्य करत नसल्याने पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांना त्रास झाला.

Last Updated : Feb 6, 2020, 11:32 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details