महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेत कोरोनाचे थैमान, गेल्या २४ तासात 3 हजार 176 नागरिकांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 3 हजार 176 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.

United States records 3,176 #Coronavirus deaths in 24 hours
United States records 3,176 #Coronavirus deaths in 24 hours

By

Published : Apr 24, 2020, 1:00 PM IST

वॉशिंग्टन - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सध्यपरिस्थितीत कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये पसरला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 3 हजार 176 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये आतापर्यंत 47 हजार 272 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांची संख्या 8 लाख 56 हजार 209 वर पोहोचली आहे. न्युयॉर्क आणि न्युजर्सीमध्ये सर्वांत जास्त कोरोना बाधित आढळले आहेत. तर जगभरात एकूण 1 लाख 85 हजार मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अमेरिका हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. तरीही एका विषाणूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. महासत्ता असलेला देश प्रथमच एवढा संघर्ष करताना दिसत आहे. अमेरिकेस कोरोनाचा सामना करताना कमालीचे अपयश आले आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फिलिपाईन्स सरकारने येत्या 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. कोरोनामुळे कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details