वाशिंग्टन -अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्याची जबाबदारी आमची असून आम्ही त्यांना लवकरच परत घेऊन येऊ, असे वचन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नागरिकांना दिले आहे. व्हाईट हाऊस मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच बायडेन म्हणाले, हे इतिहासातील सर्वात मोठ्या एअरलिफ्टपैकी एक आहे.
अफगाणिस्तानला 20 वर्षे मदत केली -
जो बायडेन म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानला युद्धपरिस्थितीत 20 वर्षे मदत केली. अनेक अमेरिकन नागरिक त्याठिकाणी आहेत. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती हिंसक झाली आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणं आपली जबाबदारी आहे. अमेरिका प्रत्येक नागरिकाला परत आणणार. त्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.