वॉशिंग्टन (यू.एस.ए)- वायू प्रदूषण घटल्यास शरीरावार त्याचे चमत्कारिक परिणाम होतात, असे एका आभ्यासातून समोर आले आहे. 'एन्व्हायरोमेंटल कमेटी ऑफ दी फॉरम ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटी' ने 'हेल्थ बेनेफिट ऑफ एअर रिडक्शन' या विषयावर अभ्यास केला होता. या अभ्यासावरून त्यांनी ही माहिती दिली आहे.
सदर विषयावर 'थोरासिस सोसायटी जर्नल' या मासिकेत माहिती छापून आली आहे. आम्ही केलेल्या अभ्यासातून आम्हाला अभूतपूर्व परिणाम मिळालेले आहेत. वायू प्रदूषण कमी केल्यास प्रकृती चांगली राहात असून शरीराची रोग प्रतिरोधक क्षमताही वाढत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सरकारांनी 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन' च्या पर्यावरण संरक्षण विषयक मार्गदर्शक सुचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सदर विषयावर लिखाण करणाऱ्या आघाडीच्या लेखिका डॉ. डीन श्रौफनेगल यांनी सांगितले आहे.