महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 11, 2021, 3:58 PM IST

ETV Bharat / international

अमेरिकेचे एक पाऊल पुढे! फायझरची लस १२ ते १५ वयोगटातील मुलांनाही मिळणार

लहान मुलांचे लसीकरण कधी होणार याची चिंता अमेरिकेतील पालक, शाळा प्रशासन आणि सार्वनजिक आरोग्य अधिकाऱ्यांना लागलेली आहे. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना डोस दिल्यानंतर त्यांना शालेय शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

फायझर
फायझर

वॉशिंग्टन- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असताना अमेरिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या नियामक संस्थेने लहान मुलांनाही कोरोनोची लस देण्याकरता फायझरला मंजुरी दिली आहे. हा लशींचा डोस १२ ते १५ वर्षांच्या मुलांना देण्यात येणणार आहे.

अमेरिकेच्या मध्यवर्ती लस सल्लागार समितीने फायझरच्या लशीची शिफार सकेल्यानंतर लवकरात लवकर मुलांचे लसीकरण सुरू होणार असल्याची शक्यता आहे. अमेरिकेत सामान्य स्थिती होण्यासाठी सर्वच वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. बहुतांश लशींना केवळ ही प्रौढांवरील वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

लस मिळाल्यानंतर मुलांना शालेय शिक्षणाचा मार्ग होणार मोकळा-

फायझरची लस विविध देशांमध्ये वापरण्यात येत आहे. कॅनडाने नुकतेच फायझरची लस १२ वर्षांहून अधिक वयोगटासाठी मंजूर केली आहे. लहान मुलांचे लसीकरण कधी होणार याची चिंता अमेरिकेतील पालक, शाळा प्रशासन आणि सार्वनजिक आरोग्य अधिकाऱ्यांना लागलेली आहे. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना डोस दिल्यानंतर त्यांना शालेय शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा-'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये तयार होतात अधिक अँटिबॉडीज-

अमेरिकेची अन्न आणि औषध प्रशासनाने फायझर लस ही लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. या लशीची चाचणी १२ ते १५ वयोगटातील २ हजारांहून अधिक मुलांवर घेण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लस घेतलेल्या मुलांमध्ये कोरोनाला प्रतिबंधक अशा अँटीबॉडीज या प्रौढांच्या तुलनेत अधिक तयार होत असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा-लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेव पडला आजारी, नऊ दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू

फायझर आणि जर्मन पार्टनर बायोनटेक कंपनीने लशीच्या वापरासाठी युरोपीयनसह इतर देशांमध्ये परवानगी मागितली आहे. फायझर ही लहान मुलांसाठी लस उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details