स्टॉकहोम - हवामान बदल हा विषय गांभीर्याने घेऊन त्याच्यावरील उपाययोजनेसाठी लवकरात प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केले. नोबेल पुरस्कारांची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढील आठवड्यात कार्यक्रम होणार आहे, यासाठी पुरस्कार विजेते स्पेनच्या स्टॉकहोम शहरात एकत्र आले असून त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्रचे नोबेल मिळवलेल्या या विजेत्यांनी शनिवारी हवामान बदल ही समस्या जाणून घेतली. स्पेनमधील माद्रिद शहरात २ ते १५ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान परिषद सुरू आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा -इतके तापमान ३० लाख वर्षांपूर्वीही नव्हते, संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा
सुर्याप्रमाणे परिक्रमा करणाऱ्या एका ताऱ्याचा शोध लावल्याने डिडिएर क्वेलोज यांना भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाले आहे. हवामान बदल आणि त्यावरील उपाययोजना यावर लोक गांभीर्याने विचार करत नसतील तर शेवटी-शेवटी त्यांच्यावर पृथ्वी सोडायची वेळ येईल, असा इशारा क्वेलोज यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, लोकांचे असे वागणे खूपच निष्काळजीपणाचे आहे. इतर ग्रह किंवा तारे आपल्यापासून खूप दूर आहेत. सध्याच्या परिस्थितीत मला पृथ्वीला वाचवण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही. काहीजण परग्रहावर जाण्याचा विचार करतात, पण आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की, पृथ्वीवरील जीवसृष्टी फक्त याच ग्रहावर चांगली राहू शकते, विकसित होऊ शकते. आपली रचना ही इतर ताऱ्यांवर राहण्यासारखी पूरक झालेली नाही. त्यामुळे हा विचार बाजूला सारून हवामान बदल समस्येवर आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करावी.
हेही वाचा -महाभियोग याचा अर्थ दोषी ठरणे किंवा राजीनामा नव्हे...
या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आपल्याला जगण्याच्या पद्धतीतच बदल करावा लागेल, विशेषत: श्रीमंत देश जे नैसर्गित संसाधनांचा, ऊर्जेचा अधिक वापर करतात, त्यांनी यावर अधिक काम करायला हवे, असे अर्थशास्त्राचे नोबेल मिळवलेल्या एस्थर डुफ्लो यांनी सांगितले.