हैदराबाद - जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून जगभरातील 63 लाख 65 हजार 173 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 लाख 77 हजार 397 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जगभरातील 29 लाख 3 हजार 382 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात 63 लाखांहून अधिक कोरोनाबाधित
जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून जगभरातील 63 लाख 65 हजार 173 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
संपादित छायाचित्र
चीनमध्ये पाच नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून पाचही जण दुसऱ्या देशातून आल्याचे चीनने म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था खालावली आहे. मात्र, चीनमध्ये काही सामाजिक अंतर, मास्क यांसह अंशी शाळा, उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.
हेही वाचा -भूकंपाच्या धक्क्याने हादरली जपानची राजधानी, ५.६ रिश्टरस्केल तीव्रतेची नोंद