न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंबरोबर बैठक घेतली. दोन्ही देशांमध्ये उर्जा क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी उपलब्ध संधीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. ह्युस्टन शहरातील पोस्ट ओक या हॉटेलमध्ये ही बैठक झाली.
ह्युस्टनला येवून उर्जा क्षेत्राबद्दल न बोलणे अशक्य - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंबरोबर बैठक घेतली.
ह्युस्टन मध्ये येवून उर्जा क्षेत्रांसंबधी न बोलण अशक्य आहे, असे मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये उर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणुक करण्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत, त्यावर चर्चा झाली. यावेळी अमेरिकेतील उर्जा क्षेत्रातील कंपनी टेलुरीयन आणि पेट्रोनेट यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विजय गोखले हेही उपस्थित होते.
बैठकीमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक, नव्या संधी आणि उर्जा क्षेत्रातील सुरक्षितता यावर चर्चा झाली, असे ट्विट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले.