महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

संयुक्त राष्ट्राचे सर्व कर्ज भारताने फेडले; यादीत पाकिस्तान-चीनचा उल्लेखही नाही

अकबरुद्दीन यांनी कर्ज फेडणाऱ्या देशांची यादी जारी केली आहे. यामध्ये भारत, भूटान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी नॉर्वे, सिंगापूर, इटली यांच्यासह इतर देशांचा समावेश आहे. मात्र, चीन आणि पाकिस्ताचे नाव या यादीत नाही.

संयुक्त राष्ट्राचे सर्व कर्ज भारताने फेडले

By

Published : Oct 12, 2019, 4:53 PM IST

न्यूयॉर्क/नवी दिल्ली - भारताने संयुक्त राष्ट्राच्या संपूर्ण कर्जाची परतफेड केली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी टि्वट करून ही माहिती दिली. ११ ऑक्टोबरपर्यंत संयुक्त राष्ट्राकडून घेतलेले सर्व कर्ज भारताने फेडले आहे. 'ऑल पेड.. १९३ देशांपैकी फक्त ३५ देशांनी संयुक्त राष्ट्राचे कर्ज फेडले आहे', सय्यद अकबरुद्दीन यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

अकबरुद्दीन यांनी कर्ज फेडणाऱ्या देशांची यादी जारी केली आहे. यामध्ये भारत, भूटान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी नॉर्वे, सिंगापूर, इटली यांच्यासह इतर देश सामील आहेत. मात्र चीन आणि पाकिस्ताचे नाव या यादीत नाही.

दरम्यान पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका दौऱ्यावेळी खर्च वाचवण्यासाठी राजदूताच्या निवासस्थानी थांबले होते. तसेच, इम्रान यांनी पंतप्रधान बनल्यानंतर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आलिशान सरकारी गाड्यांपासून ते गाढवे आणि म्हशींचीही विक्री केली होती. सरकारी मालकीच्या १०२ गाड्यांपैकी ७० गाड्यांचा लिलाव करण्यात आला. नुकतेच आशिया खंडातील देशावर संयुक्त राष्ट्राच्या 'ट्रेड आणि डेव्हलपमेंट' अहवालामध्ये पाकिस्तानच्या दिवाळखोरीची माहिती देण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details