न्यूयॉर्क - न्यूयॉर्क शहरातील तीन विमानतळांवर मास्क घालण्यास नकार देणाऱ्यांवर सोमवारपासून अधिकारी 50 डॉलर्सचा दंड आकारण्यास सुरवात करणार आहेत.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, हा नियम जॉन एफ. केनेडी इंटरनॅशनल, लागूआर्डिया आणि नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लागू होणार आहे. तसेच, मॅनहॅटनला न्यू जर्सी आणि मिडटाउनशी जोडणाऱ्या रेल्वे आणि फलाट येथेही हा नियम लागू होईल. याशिवाय, वॉशिंग्टन हाइट्स मधील बंदर प्राधिकरणाच्या बस टर्मिनल्सना जोडणाऱ्या गाड्यांमध्येही हा नियम बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा -फ्रान्सची द्वेषयुक्त ट्वीटबद्दल महाथिर यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी
'मास्क न घातलेल्या व्यक्तींना 50 डॉलर्सचा दंड आकारला जाईल. आम्ही मास्क घालण्याची गरज लोकांना पटवून देण्यासाठी नियम कठोरपणे राबवणार आहोत,' असे बंदर प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक रिक कॉटन शुक्रवारी म्हणाले.
न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमधील राज्यपालांशी संबंधित कार्यकारी आदेश पाळणे बंधनकारक करणे हे या नव्या या कारवाईचे लक्ष्य आहे. दरम्यान, शहरातील कोविड -19 च्या संसर्गाच्या दरात दोन टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे.
न्यूयॉर्क सिटीचे महापौर बिल डी ब्लासिओ यांच्या म्हणण्यानुसार, या बेंचमार्कचा परिणाम म्हणून व्यापार बंद होणे आणि विविध समारंभांवर निर्बंधही येऊ शकतील.
हेही वाचा -फिलिपाईन्समध्ये 'टायफून मोलावे'च्या बळींची संख्या 22 वर