महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Donald Trump
Donald Trump

By

Published : Apr 15, 2020, 8:40 AM IST

वाशिग्ंटन - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निधीवर अमेरिका नियत्रंण आणणार असल्याचे म्हटले होते.

अमेरिकन प्रशासनला जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश दिले असल्याचे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल अशी भूमिका घेतली आणि कोरोनाप्रसाराबाबत तथ्य लपवले.. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराबद्दलची माहिती लपवणे आणि गैरव्यवस्थापन याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची समिक्षा करण्यात येत आहे. समिक्षापूर्ण होईपर्यंत अमेरिका संघटनेला निधी पूरवणार नाही.

कोरोनाच्या उद्रेकात डब्ल्यूएचओ आपले कर्तव्य बजाविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जेव्हा हा विषाणू चीनमध्ये पसरला, तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने ते लपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरोनावर राजकारण करू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details