वॉशिंग्टन डी. सी. - रोगकारक किटाणूंना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ कमी करण्यासाठी प्रतिजैविकांचा औषध म्हणून वापर केला जातो. या प्रतिजैविकांचे मानवी शरीरावर काही चांगले परिणामही होत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.
कॅन्सरच्या उपचारांमध्ये प्रतिजैविके ठरू शकतात वरदान!
कॅन्सरच्या उपचारांमध्ये साधारण प्रतिजैविकांचा वापर केल्यास किरणोत्सारी उपचारांमध्ये सुलभता होते. प्रतिजैविके शरीरातील सुदृढ पेशींना कॅन्सरग्रस्त पेशींचा नाश करण्यात मदत करतात.
कॅन्सरच्या उपचारांमध्ये साधारण प्रतिजैविकांचा वापर केल्यास किरणोत्सारी उपचारांमध्ये सुलभता होते. प्रतिजैविके शरीरातील सुदृढ पेशींना कॅन्सरग्रस्त पेशींचा नाश करण्यात मदत करतात. 'जर्नल ऑफ क्लिनीकल इनव्हेस्टीगेशन' या आरोग्यविषयक जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
हेही वाचा - वायू प्रदूषण घटल्यास शरीरावर होणार चमत्कारिक परिणाम
सरासरी अर्ध्यापेक्षा जास्त कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान 'रेडीएशन थेरेपी'चा अवलंब करावा लागतो. मागच्या काही कालावधीमध्ये झालेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की, रेडीएशन थेरेपीमुळे शरीरातील सुदृढ पेशींही काही प्रमाणात नुकसान होते. यावर उपाय म्हणून रेडीएशन थेरेपी अगोदर प्रतिजैविकांचा वापर केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो, असे संशोधक अँड्रीया फॅसिबीने यांनी सांगितले.