अमेरिकन अध्यक्षपदी बराक ओबामा असताना पूर्वीच्या राजवटीने इराणच्या आण्विक महत्वाकांक्षा काबूत ठेवण्यासाठी संयुक्त सर्वसमावेशक कृती योजनेला (जेसीपीओए) मोठे यश म्हणून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पण पुढील अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्या योजनेला भंगारात टाकण्याचा निर्धार केला. ती एका शेवटाची सुरूवात होती. आण्विक करारातून ट्रंप यांनी अंग काढून घेतल्यापासून त्यांनी दबावतंत्र वापरून इराणला वश करण्यासाठी व्यापक निर्बंध लादले. अमेरिकेने अगोदरच गंभीर स्वरूप धारण केलेल्या शिया-सुन्नींमधील फूट तसेच ज्यावरून गंभीर मतभेद होऊ शकतात अशा मुद्याचा उपयोग करून घेतला आणि एकमेकांशी अस्तित्वाच्या मुद्यावरून वैरभाव असलेल्या सौदी आणि अप्रत्यक्षपणे इस्राईलवर भरपूर दबाव टाकला.
ट्रंप यांचे सल्लागार आणि जावई जॅरेड क्रुशनर यांच्या कार्यकालात इस्राईल आपल्या आखातातील शेजाऱ्यांपर्यंत पोहचण्याचा स्वागतार्ह बदल सुरू झाला असला, तरीही इराणियन आव्हान अधिकच अवघड होऊन बसले ज्यामुळे इराणचा हात आणि प्रभाव अगदी दृष्यमान असलेल्या संघर्षांनी हानी पोहचलेल्या प्रदेशातील अस्थिरतेत आणखी भरच पडली आहे. लिबिया, येमेन, इराक, गाझा, सिरिया आणि लेबानन अमेरिकेच्या हिताला समतुल्य बनले. हेजबुल्ला, हमास, हौथीस आणि इराकमधील शिया अतिरेकी गट यांच्यासारख्या अनेक गैरसरकारी गटांशी इराणचे निकटचे संबंध आहेत जे त्यांना प्रभाव विस्तारित करण्याची साधने पुरवतात.
जेसीपीओएमधून अमेरिकेने माघार घेतल्याने अनेक नकारात्मक घटना घडल्या आहेत ज्या पर्शियन आखातात युद्ध भडकवण्याच्या कडेवर आल्या असून त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापार आणि उर्जा हस्तांतरणाच्या दृष्टीने विपरित अशा अत्यंत महत्वाच्या अनेक घटना घडल्या. सुदैवाने अमेरिकन लष्कराचे ड्रोन पाडण्याची आणि आखातात अनेक जहाजे बुडवण्यात आल्याच्या घटना तसेच सौदी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर केलेला हल्ला यांना थेट प्रतिसाद न दिल्याने भडका उडाला नाही.पण नंतर डिसेंबर २७ रोजी अमेरिकन कंत्राटदाराला अतिरेकी हल्ल्यात ठार मारल्याचा हा प्रतिसाद म्हणून अध्यक्ष ट्रंप यांनी इराणियन अल कुर्द फौजांचा प्रमुख मेजर जनरल कासीम सोलेमानी यांच्या हत्येचा आदेश दिला आणि बगदाद विमानतळावर त्याला ठार करण्यात आले. ड्रोनच्या हल्ल्यात आणखी एक अतिरेकी गटाचा उच्चाधिकारी नेता अल मुहानदी हाही ठार झाला. परदेशी सरकारांकडून अनेक सेवारत असलेल्या जनरल्सना इतक्या निर्लज्जपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे दोन देशांमधील लाल रेषेचा भंग असून हा काही कराराचा निकष राहिलेला नाही. शिवाय हे इतके अचानक घडले आहे की दोन्ही बाजूंनी युद्घाचा मार्ग सोडला होता आणि अनेक मध्यस्थांच्या माध्यमातून एक प्रकारचे सामंजस्य आणि संवाद साधण्यावर काम करत होते.
इराणला बसलेला धक्का आणि झालेले तीव्र दुःख नैसर्गिक होते आणि सोलेमानीच्या अंत्यसंस्काराला झालेली खूप मोठी गर्दी तसेच अमेरिकेचा सूड आणि मृत्यु घडवून आणण्याच्या दिल्या जात असलेल्या घोषणा या त्याचा पुरावा होता. ट्विटर युद्ध सुरू झाले होते आणि आनुषंगिक भयावह परिणाम क्षितिजावर खरा भडका उडणार असल्याचे दिसू लागले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनी आणि इतर नेत्यांनी प्रत्युत्तर आणि सूडाचा निर्धार केला, यात काहीच आश्चर्य नाही. अमेरिकनांना त्यांच्या दूतावासातील कर्मचार्यांना इतर अमेरिकन नागरिकांना आणि इराकमधीलही इमारती रिकाम्या करण्यास भाग पाडण्यात आले तसेच कारण आतापर्यंत त्यांच्या ताब्यात असलेला इराकही संतप्त असून अमेरिकेच्या मनमानी आणि अविवेकी कारवाईने त्याच्या सार्वभौमतेचा भंग झाला आहे. इराकी संसदेने अमेरिकन्सना देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला असून बहुधा देशाचा हा सर्वाधिक वाईट भू-डावपेचात्मक तोटा आहे. आतापर्यंत अमेरिका प्रदेशातील त्याच्या सातत्याने असलेल्या लष्करी अस्तित्वाबद्दल द्विधावस्थेत होती आणि अफगाणिस्तान ते सिरीयापर्यंत माघार घेण्याच्या अवस्थेत दिसत होती. पण ही आणि इतर पूर्वी घडलेल्या घटना आणि अपघातांमुळे अमेरिकेला आपले लष्करी अस्तित्व मजबूत करावे लागले आणि परिणामी अमेरिकन हिताला आणि मालमत्तांना असलेला धोका कमी होण्याऐवजी वाढला होता.