महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : आज मतदान; रेकॉर्ड ब्रेक आकडेवारीची शक्यता

आतापर्यंत १० कोटी नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, आज सुमारे सहा कोटी लोक मतदान करतील असा अंदाज सध्या वर्तवण्यात येतो आहे.

10 crore Americans have already voted, another 6 crore likely to vote on Tuesday
अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : आज पार पडणार मतदान; रेकॉर्ड ब्रेक आकडेवारीची शक्यता

By

Published : Nov 3, 2020, 9:02 AM IST

Updated : Nov 3, 2020, 11:12 AM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सध्या सुरू आहे. आज (मंगळवार) यासाठीचे मतदान पार पडणार आहे. आतापर्यंत दहा कोटी नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, आज सुमारे सहा कोटी लोक मतदान करतील असा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक मायकेल पी. मॅक्डॉनल्ड यांनी याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मायकेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत सुमारे २३.९ कोटी नागरिक मतदान करण्यास पात्र आहेत. तर त्यांपैकी दहा कोटी नागरिकांनी यापूर्वीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर आज सुमारे सहा कोटी नागरिकांनी मतदान केल्यास ही एक रेकॉर्डब्रेक आकडेवारी ठरणार आहे.

काही राज्यांमध्ये २०१६च्या तुलनेत अधिक मतदान..

मायकेल यांनी आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, हवाई, टेक्सस आणि मोंटाना या राज्यांमध्ये आताच २०१६ पेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. यासोबतच, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया, न्यू मेक्सिको, नेव्हाडा आणि टेनेसीमध्ये पहिल्यांदाच मतदानाच्या दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात मतदानाची नोंद झाली आहे. या राज्यांमध्ये २०१६च्या तुलनेत आताच ९० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.

एकूण परिस्थितीचा अभ्यास करुन, अमेरिकेत यंदा सुमारे ६७ टक्के मतदान होण्याची शक्यता मायकेल यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : 'मतमोजणीत घोळ होणार'... निवडणुकीआधी ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य

Last Updated : Nov 3, 2020, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details