महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मालीच्या नेत्यासह तीन युरोपीय बंदिवानांची दहशतवाद्यांकडून सुटका

सोमालिया सिस्से या नेत्याच्या कुटुंबीयांना आणि फ्रेंच प्रतिनिधी सोफी पेट्रोनिन यांना मंगळवारीच याबाबत माहिती देण्यात आली होती. मक्काली नावाच्या एका रोमन कॅथलिक मिशनरीला २०१८मध्ये दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. तर, निकोला सिआक्को नावाच्या एका व्यक्तीलाही २०१८मध्येच ताब्यात घेण्यात आले होते. यावर्षी एप्रिलमध्ये दहशतवादी संघटनांच्या एका व्हिडीओमध्ये हे दोघे दिसले, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे समजले होते...

By

Published : Oct 9, 2020, 11:47 AM IST

Mali: 3 European hostages, 1 Malian politician freed
मालीच्या नेत्यासह तीन युरोपीय बंधकांची दहशतवाद्यांकडून सुटका

बामाको :माली देशातील एक मोठा नेता आणि तीन युरोपीय व्यक्तींना जिहाद्यांनी बंदिवान बनवून ठेवले होते. त्यांची सुटका करण्यात आल्याचे सरकारने गुरुवारी जाहीर केले. दहशतवाद्यांचा हा ग्रुप अल-कायदा संघटनेशी संबंधित असल्याची माहिती माली सरकारने दिली.

सोमालिया सिस्से या नेत्याच्या कुटुंबीयांना आणि फ्रेंच प्रतिनिधी सोफी पेट्रोनिन यांना मंगळवारीच याबाबत माहिती देण्यात आली होती. मक्काली नावाच्या एका रोमन कॅथलिक मिशनरीला २०१८मध्ये दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. तर, निकोला सिआक्को नावाच्या एका व्यक्तीलाही २०१८मध्येच ताब्यात घेण्यात आले होते. यावर्षी एप्रिलमध्ये दहशतवादी संघटनांच्या एका व्हिडीओमध्ये हे दोघे दिसले, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे समजले होते. त्यांच्यासोबतच आणखी एका युरोपीय व्यक्तीलाही बंदिवान बनवल्याचे दिसले होते.

मालीच्या नेत्यासह तीन युरोपीय बंधकांची दहशतवाद्यांकडून सुटका

माली सरकारने गेल्या आठवड्यातच तब्बल १८० जिहादींची सुटका केली होती. दहशतवाद्यांकडे असलेल्या बंदिवानांची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून जिहादींनी देशाच्या विरोधी पक्षातील एका मुख्य नेत्याला आपल्या ताब्यात ठेवले होते. सोमालिया सिस्से या नेत्याला मार्चमध्ये दहशतवाद्यांनी पकडून नेले होते. त्यानंतर त्यांनी माली सरकारशी बंदिवानांच्या सुटकेसाठी बोलणी सुरू केली होती. यानंतर, गेल्या शनिवारी सरकारने ७० जिहादींना आणि रविवारी ११० जिहादींना मुक्त केले. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : १८० जिहादी कैद्यांना मुक्त करण्याचा माली सरकारचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details