मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण याला यावर्षी पहिल्यांदाच वडील झाल्याचा आनंद मिळाला. आदित्यच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. खुद्द आदित्यने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. तेव्हापासून गायकाचे चाहते त्याच्या मुलीच्या एका झलकची वाट पाहत होते. आता आदित्य नारायण यांनी तीन महिन्यांनी मुलीचा चेहरा दाखवला आहे.
आदित्य नारायणने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. गायकाने मुलीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची मुलगी लहान टोपलीप्रमाणे असलेल्या पाळणामध्ये दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत आदित्य नारायण यांनी लिहिले आहे, 'तीन महिन्यांची मुलगी, आमची परी'.
आदित्य नारायण यांच्या मुलीचे नाव त्वषा आहे. मुलगी दोन महिन्यांची असताना एका फोटोसह या जोडप्याने याचा खुलासा केला होता. उदित नारायण आणि त्यांच्या पत्नीने वेळोवेळी चाहत्यांना गरोदरपणाचे फोटो शेअर करून अपडेट्स दिले होते.