मुंबई- अभिनेता प्रभासच्या बहुप्रतीक्षित भव्य आदिपुरुष चित्रपटाचा प्री रिलीज इव्हेंट तिरुपती येथे मंगळवारी संध्याकाळी पार पडणार आहे. या भव्या सोहळ्याच्या आधी मंगळवारी पहाटे, प्रभास त्याच्या टीमसोबत तिरुपती बालाजी मंदिरात दिसला. चाहत्यांच्या जोरदार स्वागतादरम्यान त्याने भगवान बालाजीचे दर्शन केले.
प्रभासच्या मंदिराच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर आली आहेत, ज्यामध्ये प्रभास आणि त्याची टीम फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या अनेक फोटोमध्ये प्रभास त्याच्या टीममेट्स आणि अनेक पोलिसांच्या भोवती दिसत आहे. प्रभास जेव्हा मंदिरात आला तेव्हा अनेक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत तो त्याच्या चाहत्यांना आणि पत्रकारांना भेटला. या भेटीसाठी प्रभासने पांढरा कुर्ता आणि धोती परिधान केली होती. याव्यतिरिक्त, त्याला मंदिराकडून एक लाल रंगाची शाल मिळाली, जी त्याने स्वतःभोवती गुंडाळली. निघण्यापूर्वी, प्रभासने हसत चाहत्यांना अभिवादन केले.
प्रभासच्या स्वागतासाठी चाहत्यांची अफाट गर्दी - तिरुपती मंदिरात दर्शनासाठी प्रभास पहाटे पोहोचणार आहे याची कल्पना त्याच्या चाहत्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे मंदिर परिसरात काल रात्रीपासूनच लोक जमायला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत या ठिकाणी हजारो चाहते दाखल झाले होते. जेव्हा प्रभास येथे पोहोचला तेव्हा त्यालाही इतकी ग्रदी पाहून आश्चर्य वाटले.
आदिपुरुष हा चित्रपट महाकाव्य रामायणाची आधुनिक आवृत्ती, ओम राऊत यांनी दिग्दर्शित केली आहे. चित्रपटात प्रभास राघवाची भूमिका साकारत आहे आणि क्रिती सेनॉन जानकीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. आदिपुरुषसाठी ओम आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. राघवच्या भूमिकेत प्रभासला कास्ट करण्याबद्दल बोलताना, ओम म्हणाला होता की भारतीय महाकाव्य रामायणच्या या हाय-प्रोफाइल सादरीकरणातील भूमिका फक्त प्रभासच साकार करु शकतो.