महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ektaa Kapoors birthday : तुषार कपूरने बहीण एकता कपूरच्या वाढदिवसानिमित्त समर्पित केले 'हे' प्रसिद्ध गाणे

अभिनेता तुषार कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर बहीण एकता कपूरसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शेअर केल्या. वाढदिवसाच्या खास शुभेच्छांमध्ये त्याने हरे राम हरे कृष्णा या चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी समर्पित केल्या.

Ektaa Kapoors birthday
एकता कपूर वाढदिवस

By

Published : Jun 7, 2023, 5:12 PM IST

मुंबई - बॉलिवूड आणि डेली सोपची क्विन निर्माती एकता कपूर आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्हीवरील मालिकांची निर्विवाद राणी असलेल्या एकताने मनोरंजन क्षेत्रात आपले स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. आज तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना तिचा भाऊ तुषार कपूरने बहिणीसाठी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तुषारने एकतासोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'फूलों का तारों का सबका कहना है, एक हज़ारों मेरी बहना है, सारी उमर हमें संग रहना हैं। जन्मदिन मुबारक रवि की मम्मी।' तुषारने पोस्ट शेअर करताच, सोशल मीडियावर एकतासाठी चाहते शुभेच्छा देण्यासाठी पुढे सरसावले. तुषार आणि एकतामध्ये असलेले पवित्र नाते चाहत्यांना खूप आवडले असून या भावा बहिणींच्या प्रेमाबद्दल संदेश देत आहेत.

एकता कपूरला तिच्या फिल्म आणि टीव्हीइंस्ट्रीतील सहकारी व निर्मात्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. ती मुंबई विमानतळावरुन बाहेर येत असताना तिच्या एका चाहत्याने तिला केक भेट म्हणून दिला. तिच्यावर उदंड चाहते प्रेम करतात हेच यातून स्पष्ट झाले.

एकता कपूरचा जन्म 7 जून 1975 रोजी झाला. तिने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन उद्योगात पाऊल टाकले आणि आपल्या करिअरची सुरुवात केली. 1995 च्या सिटकॉम हम पांच नंतर ती यशस्वी निर्माती म्हणून लोकप्रिय झाली. नंतर 2000 मध्ये, तिची टीव्ही मालिका क्यूंकी सास भी कभी बहू थी ही सर्वात यशस्वी ठरली. त्यानंतर तिने कहानी घर घर की, कभी सौतन कभी सहेली, कलश, कसौटी जिंदगी की, आणि कसम से असे अनेक हिट शो केले. एकता अलिकडेच बॉलिवूड स्टार कंगना रणौतने होस्ट केलेला निर्भय रिअ‍ॅलिटी शो लॉक अप देखील घेऊन आली होती. एकता कपूरचा टीव्ही क्षेत्रात मोठा दबदबा तयार झाला आहे. सर्वाधिक हिट शो तिच्या नावावर आहेत. बालाजी प्रॉडक्शन हे नाव देखील या उद्योगात खूप महत्वाचे मानले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details