दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा नेहमी आपली राजकीय, सामाजिक मत प्रदर्शित करत असते. यामुळे अनेकदा ती टीकेचीही धनी बनते. मात्र आपल्या बिनधास्त स्वभावाने या गोष्टींकडे दुर्लक्ष करत ती आपली वाटचाल सुरू ठेवते.
सध्या तिचा एक ट्विट खूप चर्चेत आहे. रिचा चढ्ढाच्या या ट्विटला आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी आदेश लागू करण्याचे विधान केले होते, त्याची पार्श्वभूमी आहे. शासनाने सांगितल्यास लष्कर पीओके परत घेण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असेही ते म्हणाले होते.
रिचा चढ्ढाच्या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली या पार्श्वभूमीवर रिचा चढ्ढाने ट्विटमध्ये लिहिले होते, 'गलवान म्हणतोय हाय." कमांडर लेफ्टनंट जनरलच्या विधानानंतर अभिनेत्रीने ही कमेंट केली होती. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी अभिनेत्रीला काँग्रेस आणि राहुल गांधींची पुजारी म्हणत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या वादावर पडदा टाकत रिचा चढ्ढाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने दिलगिरी व्यक्त करत लिहिले आहे की हा तिच्यासाठी देखील एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तिचा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. तिने सांगितलेल्या तीन शब्दांमुळे तिला जबरदस्तीने वादात ओढले गेल्याचेही रिचाने म्हटले आहे.
रिचा चढ्ढा यांनी तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा कधीच नव्हता. मी बोललेल्या तीन शब्दांमुळे मला वादात ओढले गेले. माझ्या बोलण्याने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे माझ्या सैनिक बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. यासोबतच मला हेही सांगायचे आहे की माझे आजोबाही सैन्यात होते. माझे मामा पॅराट्रूपर होते. देशभक्ती माझ्या रक्तात आहे. देश वाचवताना मुलगा शहीद झाला की कुटुंबावर वाईट परिणाम होतो. सैनिक जखमी झाल्यास त्याचा काय परिणाम होतो हे मला चांगले माहीत आहे. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दाही आहे.
हेही वाचा -Indian Army : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास तयार, फक्त सरकारी आदेशाची वाट पाहत आहोत - उपेंद्र द्विवेदी