बेंगळुरू - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने तिला लॉन्च केलेल्या प्रॉडक्शन हाऊसला कमी लेखल्याचे सांगत कन्नड चित्रपट उद्योगातून तिच्यावर बंदी घालण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, "मला फक्त त्यांच्यावर प्रेम आहे. बाकीचे त्यांच्यावर अवलंबून आहे."
कंतारा फेम दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी याने रश्मिका मंदाना हिला किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून अभनयाची पहिली संधी दिली होती. चार्ली ७७७ फेम ऋषभ शेट्टीचा मित्र रक्षित शेट्टी या चित्रपटाचा नायक होता. रश्मिका आणि रक्षित शेट्टी प्रेमात पडले आणि एंगेजमेंटही झाली होती. या जोडप्याने विसंगतीचे कारण देत ब्रेक अप केले होते. नंतर रश्मिकाने तेलुगू चित्रपटसृष्टीत यश मिळवले आणि ती एक यशस्वी अभिनेत्री बनली.
नुकतेच रश्मिकाला तिच्या लाँचबद्दल विचारले असता, तिने प्रोडक्शन हाऊस किंवा दिग्दर्शकाचे नावही घेतले नाही. तिने एअर कोट्सचा वापर केला आणि म्हणाली, "या प्रोडक्शन हाऊसने माझ्याशी संपर्क साधला आणि मला या प्रकल्पात सामील करून घेतल्याबद्दल ते हेड ओव्हर हिल्स झाले."