मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022'मध्ये तिची चमक दाखवत आहे. दीपिका पदुकोण येथे ज्युरी सदस्य म्हणून सामील झाली आहे. भारतीय सेलिब्रिटी कान्स ज्युरी सदस्यात सामील झाले आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे. दीपिका गेल्या सहा दिवसांपासून येथे आहे आणि आता तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगही येथे पोहोचला आहे. कान्समधून समोर आलेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
फॅन पेजने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका कूल लूकमध्ये दिसत आहेत. फोटोंमध्ये रणवीर-दीपिका हसताना आणि मस्ती करताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत फिल्ममेकर आणि अभिनेत्री रेबेका हॉलही दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 दीपिका पदुकोणने आपल्या वेगळ्या लूकने गर्दी जमवण्याचे काम केले आहे.