महाराष्ट्र

maharashtra

Pregnant Rihanna to perform in Oscar : गर्भवती रिहाना ऑस्करमध्ये 'ब्लॅक पँथर'मधील 'लिफ्ट मी अप' गाणे करणार सादर

गर्भवती रिहाना ऑस्करमध्ये 'ब्लॅक पँथर' मधील अकादमी पुरस्कार-नामांकित गाणे लिफ्ट मी अप सादर करणार आहे. विशेष म्हणजे हे गाणे टॉप गन: मॅवेरिक चित्रपटामधील लेडी गागाच्या होल्ड माय हँड आणि भारतीय आरआरआर चित्रपटामधील सध्याच्या आघाडीच्या नाटू नाटू या गाण्यांशी ऑस्कर पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहे.

By

Published : Feb 25, 2023, 12:45 PM IST

Published : Feb 25, 2023, 12:45 PM IST

Updated : Feb 25, 2023, 1:26 PM IST

Pregnant Rihanna to perform in Oscar
Pregnant Rihanna to perform in Oscar

लॉस एंजेलिस- ख्यातनाम पॉप सुपरस्टार रिहाना पुढील महिन्यात ऑस्करमध्ये परफॉर्म करणार आहे, असे आयोजकांनी गुरुवारी सांगितले. ती अकादमी पुरस्कार सोहळ्यात ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर चित्रपटामधील लिफ्ट मी अप हे गाणे सादर करेल. विशेष म्हणजे रिहाना ही गर्भवती असून हॉलीवूडमधील चित्रपट उद्योगातील सर्वोच्च पुरस्कार कार्यक्रमात ती आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे.

नाटू नाटूशी स्पर्धा - ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर चित्रपटामधील लिफ्ट मी अप हे गाणे टॉप गन: मॅवेरिक चित्रपटामधील लेडी गागाच्या होल्ड माय हँड आणि भारतीय आरआरआर चित्रपटामधील सध्याच्या आघाडीच्या नाटू नाटू या गाण्यांशी ऑस्कर पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहे. आठ मल्टी-प्लॅटिनम अल्बमसह नऊ वेळा ग्रॅमी विजेती रिहानासाठी "लिफ्ट मी अप" हे पहिले ऑस्कर नामांकन आहे. 12 मार्च रोजी लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये जिमी किमेल आयोजित 95 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामन्यात दिली गोड बातमी - यापूर्वी पॉप स्टार रिहाना रविवारी ५७ व्या चँपियनशीपच्या सुपर बाउल फुटबॉल सामन्यांच्या वेळी मैदानावर हजर राहिली होती. सामन्याच्या हाफ टाईमध्ये विशेष अतिथी म्हणून ती हजर होती. यावेळी गायिका रिहाना दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची गुड न्यूज तिच्या बेबी बंपमुळे चाहत्यांना मिळाली होती. सुपर बाउल फुटबॉल सामन्यांच्या वेळी गायिकेच्या प्रतिनिधीने तिच्या अतिप्रतीक्षित सुपर बाउल LVII हाफटाइम शोच्या आधी ती गर्भवती असल्याच्या बातमीची पुष्टी केली होती. ग्रॅमी विजेती गायिका रिहाना आणि तिचा प्रियकर, रॅपर A$AP रॉकी यांनी दोन वर्षापूर्वी पहिलाया मुलाला जन्म दिला होता. त्यापूर्वी रिहाना हिने अब्जाधीश हसन जमीलपासून विभक्त होऊन रॉकीसोबत घरोबा केला होता. दोघांनी २०२० पासून डेटिंग केल्यानंतर पहिलाय मुलाला जन्म दिला.

रिहानाचे गाजलेले बेबी बंप फोटोशूट

गाजले होते बेबी बंप फोटोशूट - जेव्हा रिहाना पहिल्यांदा गर्भवती राहिली होती तेव्हा तिने एका मासिकाच्या मुकव्हरपेजवर तिच्या पूर्ण वाढ झालेल्या बेबी बंपसह झळकत इंटरनेटवर धमाल उडवून दिली होती. मॅटर्निटी फॅशनची नव्याने व्याख्या बनवत तिने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. आई होण्यासाठी सज्ज झालेल्या रिहानाने असे कपडे वापरण्याची संधी परत परत येत नसल्याने मुलाखतीत सांगितले होते.

रिहानाचे शेतकरी आंदोलनादरम्यानचे ट्विट

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - भारतात दोन वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलना पाठिंबा दिल्यामुळेही रिहाना चर्चेत आली होती. तेव्हा तिने ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आपण या शेतकर्‍यांबद्दल का बोलत नाही, असे म्हणत तिने आंदोनकर्त्यांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा -Kanganas statement about Sikhs : खलिस्तानी शिखांनी हेतु स्पष्ट करावा, कंगना रणौतचे नवे वादग्रस्त विधान

Last Updated : Feb 25, 2023, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details