मुंबई - Pooja Bhatt And Shah Rukh Khan : चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि यांची मुलगी पूजा भट्ट 1990 मध्ये व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे खूप ट्रोल झाले होते. एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये पूजा तिच्या वडिलांना किस करताना दिसली होती. वडिलांना किस करतानाचा हा फोटो खूप चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर पूजाला अनेकांनी या गोष्टीमुळं खूप काही सुनावलं होतं. हा फोटो अनेक न्यूज पेपरमध्ये पहिल्या पेजवर घेतला होता. पूजा आणि महेश भट्टचा फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.
पूजा भट्ट वडिलांसोबत चुंबन घेते : दरम्यान आता या याप्रकरणी पूजानं आपलं मत शेअर केलं आहे. जेव्हा पूजा भट्टला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, तिला फोटोशूट करून वडिलांना किस केल्याचा पश्चाताप होतो का? ज्यावर तिनं उत्तर दिलं, 'नाही, कारण मी ते अगदी सोप्या पद्धतीनं पाहते. मला वाटतं की दुर्दैवाने कधीकधी असं घडतं. एक क्षणात तुमची प्रतिमा ही चुकीच्या पद्धतीनं दाखवली जात नाही.' त्यानंतर तिनं सुपरस्टार शाहरुख खानबद्दल म्हटलं, मला आठवतं की शाहरुख खाननं मला सांगितलं होतं की, जेव्हा तुम्हाला मुली होतात, तेव्हा तुमची मुलं लहान असतात, असं किती वेळा होतं की ते तुम्हाला मम्मी म्हणतात आणि 'किस मी, डॅडी म्हणतात. ही सुद्धा तीच गोष्ट आहे.