महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 23, 2022, 3:49 PM IST

ETV Bharat / entertainment

'हिरॉईन'सोबत रंगेहाथ सापडला पती, अभिनेता मोहंतीच्या पत्नीने भर रस्त्यात केला राडा

ओडिया स्टार बाबूशान मोहंतीची पत्नी तृप्ती मोहंतीने त्याला सहकलाकार प्रकृती मिश्रासोबत पकडल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबूशानची पत्नी दोघांचे कथित संबंध असल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण करताना दिसत आहे.

'हिरॉईन'सोबत रंगेहाथ सापडला पती
'हिरॉईन'सोबत रंगेहाथ सापडला पती

हैदराबाद (तेलंगणा) - ओडिया अभिनेता बाबूशान मोहंती यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चा केली जात आहे. त्याची पत्नी तृप्ती मोहंतीने त्याला सहकलाकार प्रकृती मिश्रासोबत पकडले होते. त्यानंतर तिने प्रकृती मिश्रा हिच्यावर त्यांचे नाते बिघडल्याचा आरोप करत हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाबुशान आज सकाळी भुवनेश्वरमध्ये त्याच्या सहकलाकारासोबत असताना त्याच्या पत्नीने पकडल्याने तो अडचणीत आला. दोघांना एकत्र पाहून संतापलेल्या तृप्तीने दोघांवर शाब्दिक हल्ला केला. बाबूशानच्या पत्नीने त्यांना कारमध्ये रंगेहात पकडले होते आणि कथित संबंध असल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण करायला सुरुवात केली.

अभिनेता बाबूशान मोहंतीच्या पत्नीने भर रस्त्यात केला राडा

प्रकृतीने या विचित्र परिस्थितीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तृप्तीने तिचा पाठलाग केल्यामुळे ती पळू शकली नाही आणि तिला ऑटोरिक्षात बसू दिले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तृप्ती अभिनेत्यावर तिचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप करताना दिसत आहे.

प्रकृती आणि बाबूशान आगामी ओडिया चित्रपट 'प्रेमम'मध्ये एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, बाबूशानकडे 'दामन' आणि 'बिद्या राणा' हे आगामी चित्रपट आहेत.

हेही वाचा -केवळ '१९९' रुपयांची चप्पल घालून 'लायगर' इव्हेन्टला पोहोचला विजय देवराकोंडा

ABOUT THE AUTHOR

...view details