मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ऋषी कपूर यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. उपचारादरम्यान 30 एप्रिल 2020 रोजी अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. ऋषी यांच्या निधनाची बातमी देशभर पोहोचली तेव्हा चाहत्यांमध्ये अश्रूंचा महापूर आला. अचानकपणे ऋषी कपूर इतक्या लवकर अलविदा करतील यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते. अशा परिस्थितीत ऋषी यांची पत्नी नीतू कपूर यांनी स्वतःला कसे हाताळले असेल, हे फक्त त्यांच्याच मनाला माहिती असेल.
30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांची दुसरी पुण्यतिथी आहे. या दु:खाच्या काळात पतीच्या आठवणीने नीतू कपूर भावूक झाल्या. एका शोमध्ये ऋषीची आठवणीने त्या रडताना दिसल्या. या संदर्भात ज्येष्ठ अभिनेत्रीने एक पोस्ट करत आपल्या दुःखी मनाने काही धक्कादायक गोष्टी लिहिल्या आहेत.
नीतूने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, 'ऋषीजींना सोडून आज दोन वर्षे झाली आहेत... ४५ वर्षांचा जोडीदार गमावणे कठीण आणि वेदनादायी होते. मानसिकदृष्ट्या स्वतःला गुंतवून ठेवणे हाच त्यावेळी माझे हृदय बरे करण्याचा एकमेव मार्ग होता. चित्रपट आणि टेलिव्हिजनने माझी काळजी घेतली, ऋषीजी तुमची नेहमी आठवण राहील, तुम्ही नेहमीच सर्वांच्या हृदयात राहाल.