मुंबई -ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती ( Mithun Chakraborty ) यांना अलिकडेच बेंगळुरूच्या रुग्णालयात ( Bengaluru hospital ) दाखल करण्यात आले होते, त्यांना डिस्चार्ज ( discharged ) देण्यात आला आहे. चक्रवर्ती यांची हॉस्पिटलला भेट ही नियमित तपासणीचा भाग होती आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही, असे अभिनेत्याच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.
"मिथुनदा नियमित तपासणीसाठी गेले होते आणि काळजी करण्यासारखे काही नाही. ते आता घरीच आहेत व पूर्णपणे तंदुरुस्त आणि ठीक आहेत. घाबरण्याचे कारण नाही," असे प्रवक्त्याने सांगितले. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ अनुपम हाजरा ( Dr Anupam Hazra ) यांनी "लवकर बरे व्हा मिथुन दा" असे ट्विट केल्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू असतानाचा फोटो ऑनलाइन समोर आला आणि चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले.