महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 4, 2023, 12:30 PM IST

ETV Bharat / entertainment

Kangana wish Sid and Kiara wedding : सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी कंगना रणौतने व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. यासाठी अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडची क्विन कंगना रणौतने सिड कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

Kangana wish Sid and Kiara wedding
Kangana wish Sid and Kiara wedding

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा होणारा विवाह गेल्या काही दिवसापासून मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे. कियारा आज तिच्या मैत्रीणी आणि कुटुंबीयांसह जैसलमरला लग्नासाठी रवाना झाली आहे. जैसलमर येथील सुर्यगढ येथे किल्ल्यामध्ये ६ फेब्रुवारी रोजी हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. वधू वरांना अनेक सेलेब्रिटी आणि चाहते लग्नाच्या शुभेच्छा पाठवत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही शुभेच्छा देत कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी कंगना रणौतने व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या लग्नासाठी निमंत्रीतांची यादी तयार असून व्हीव्हीआयपी सेलेब्रिटी लग्नाला हजेरी लावणार आहेत. या यादीत सलमान, कॅटरिना, विकी कौशल यांचा समावेश असल्याचे समजत असतानाच कंगनाने व्हिडिओ स्टोरी पोस्ट सिद्धार्थ आणि कियारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाने एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर करुन सिद्धार्थ आणि कियारासाठी शुभेच्छा दिल्या. ती म्हणते, ही जोडी किती आनंदी आहे. चित्रपट व्यवसायात असे सच्चे प्रेम कमीच पाहायला मिळते. दोघेही खूप सुंदर दिसतात. कंगनाच्या या व्हिडिओने सर्वांना चकित केले आहे. कारण गेल्या काही दिवसात बॉलिवूडवर टीका करणारी कंगना पठाण चित्रपटाचे कौतुक करताना दिसली होती.

सिद्धार्थ आणि कियारा हे जोडपे इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांना त्यांच्या लग्नासाठी आमंत्रित करणार असल्याचे वृत्त आहे. कुटुंबांव्यतिरिक्त, करण जोहर, शाहिद कपूर, कॅटरिना आणि विकी कौशल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांसारखे सेलिब्रिटी आहेत. कियारासोबत चांगला बॉण्ड असलेला सलमान खानही राजस्थानमधील लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बातमीनुसार, सिड-कियाराच्या लग्नाची योजना मुंबईतील एका कंपनीने केली आहे. आयोजकांनी सिड-कियाराच्या लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था देखील केली आहे. ही सुरक्षा शाहरुख खानचा माजी अंगरक्षक यासीन सांभाळत आहे.

आधी जाहीर झाल्याप्रमाणे, कियारा-सिद्धार्थ 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी 84 लक्झरी रूम बुक केल्या आहेत. त्याचबरोबर पाहुण्यांसाठी 70 आलिशान वाहने बुक करण्यात आली आहेत. यामध्ये मर्सिडीज, जग्वार आणि बीएमडब्ल्यूचा समावेश आहे. या वाहनांचे कंत्राट जैसलमेरच्या लकी टूर अँड ट्रॅव्हल्स या सर्वात मोठ्या टूर ऑपरेटरला देण्यात आले आहे.

हेही वाचा -Sidharth Kiara Wedding: जोडपे जैसलमेरला कधी पोहोचणार; पाहुण्यांच्या यादीत सलमान, विकी आणि कॅटरिना

ABOUT THE AUTHOR

...view details