मुंबई- Junaid Khans debut film shoot wrapped : आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार याची बऱ्याच काळापासून चर्चा आहे. तो काम करत असलेल्या 'महाराज' चित्रपटाचे शुटिंग आता पूर्ण झालंय, अशी माहिती अभिनेत्री शालिनी पांडेनं दिलीय. ती देखील या चित्रपटात काम करतेय. 'महाराज' चित्रपटाची कथा 1862 च्या काळातील सुप्रसिद्ध 'महाराजा लिबेल केस'वर आधारित असल्याचे सांगितलं जातंय. हा चित्रपट नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
एका न्यूजवायरला दिलेल्या मुलाखतीत, शालिनीनं जुनैदसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे. तो असताना सेटवर मोठी उर्जा त्याच्यामुळे निर्माण व्हायची, असे ती म्हणाली. जुनेद हा एक अतिशय सहज मानवता असलेला व्यक्ती आहे, अशी कमेंटही तिनं केली. ते समवयस्क असल्याचं सांगत शालिनीनं त्याच्यातील उर्जेमुळं काम करताना खूप आनंद झाल्याचं सांगितलं.
शालिनी, 'अर्जुन रेड्डी', 'महानटी' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे शालिनी पांडे अभिनेत्री म्हणून परिचीत झाली आहे. रणवीर सिंगसोबत 'जयेशभाई जोरदार' चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. आगामी 'महाराज' चित्रपटात शालिनी अभिनेता जुनैद, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत भूमिका साकारत आहे.
हा चित्रपट 1862 च्या महाराजा लिबेल केसभोवती केंद्रित कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये एका एका धार्मिक गटाच्या नेत्यानं आपल्या महिला अनुयायांसह लैंगिक संबंधांचे आरोप प्रकाशित केल्याबद्दल एका वर्तमानपत्रावर खटला दाखल केला होता. यामध्ये जुनैद खान एका रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. या केसमुळे त्या काळात न्यायालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. सबंध बुद्धीवंतांचे आणि विचारवंतांचे लक्ष या केसच्या निकालाकडे लागले होते. भारतीय न्यायालयाच्या इतिहासात हा एक ऐतिहासिक खटला समजला जातो. ज्याची आजही अधून मधून चर्चा होत असते.