महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gulshan Devaya Birthday : फॅशन पदवीधर ते बॉलिवूड स्टार बनण्याचा गुलशन देवय्याचा प्रवास

अभिनेता गुलशन देवेय्या रविवार २८ मे रोजी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये पदवीधारक असलेल्या गुलशनने नाटकाताून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली आणि संधीच्या शोधात मुंबई गाठली. आज हिंदी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्याची ओळख आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्य त्याला अधिक जाणून घेऊयात.

Gulshan Devaya Birthday
अभिनेता गुलशन देवेय्या

By

Published : May 27, 2023, 2:02 PM IST

मुंबई- आज भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये चतुरसत्र अभिनेत्यांपैकी एक असलेल्या गुलशन देवैयाचा २८ मे रोजी ४५ वा वाढदिवस आहे. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतल्यानंतर त्याने काही काळ फॅशन इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने बंगळुरूच्या विद्यार्थ्यांना विगन आणि लेह कॉलेजमध्ये फॅशन शिकवले. दरम्यान त्याचा ओढा अभिनयाकडे वळला होता. इंग्रजी थिएटरमध्ये काम करायला सुरूवात केल्यानंतर तो मोठ्या संधीच्या शोधात मुंबईत येऊन पोहोचला.

मायानंगरी मुंबईतील गुशन देवय्याचा संघर्ष- मुंबईत आल्यानंतर त्याने वेगवेगळ्या प्रॉडक्शनमध्ये ऑडिशन देत असतानाच देवयाने 2010 मध्ये कल्की कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत अनुराग कश्यपच्या दॅट गर्ल इन येलो बूट्स या लघुपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला, त्यानंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या लघु चित्रपटात त्याने चिटिअप्पाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2011 मध्ये, तो रोहन सिप्पीच्या क्राइम थ्रिलर दम मारो दममध्ये दिसला. यामध्ये त्याने अभिषेक बच्चन, बिपाशा बसू आणि प्रतीक बब्बर यांच्यासह सहकलाकार म्हणून काम केले. त्याचे खरे नशीब उघडले ते बेजॉय नांबियारच्या शैतान या हिंदी थ्रिलर चित्रपटामुळे. यात त्याने करण चौधरी केसीची भूमिका साकारली होती. जून 2011 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट व्यावसायिक यशस्वी ठरला. यातील देवयाच्या अभिनयाची प्रशंसा झाली. फिल्मफेअर अवॉर्ड्स, स्क्रीन अवॉर्ड्स, स्टारडस्ट अवॉर्ड्स आणि अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड अवॉर्ड्स या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांसाठी त्याला नामांकने मिळाली.

अभिनेता गुलशन देवेय्या

फिल्म इंडस्ट्रीत गुलशनला मिळाले स्थैर्य- 2012 मध्ये गुलशन देवय्या विवेक अग्निहोत्रीच्या हेट स्टोरी या थ्रिलर चित्रपटामध्ये दिसला. हा चित्रपट स्लीपर हिट ठरला, आणि समीक्षकांकडून सकारात्मक पुनरावलोकने मिळविली. अनेक समिक्षकांनी त्याच्या भूमिकेचे कौतुक केले. त्याच वर्षी, त्याने निम्रत कौरसोबत वासन बालाच्या क्राईम थ्रिलर चित्रपट पेडलर्समध्ये भूमिका केली होती. या सिनेमात त्याने जो अंमली पदार्थांच्या व्यापारात अडकलेल्या 20 वर्षांच्या रणजीत डिसूझा या मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा प्रीमियर कान्स चित्रपट महोत्सवात झाला आणि याचे खूप कौतुक झाले.

अभिनेता गुलशन देवेय्या

निर्माता दिग्दर्शकापर्यंत गुलशन देवय्याची किर्ती - गुशन देवय्या हे नाव आता निर्माता आणि दिग्दर्शकांमध्ये सुपरिचीत झाले होते. संजय लीला भन्साळी यांच्या राम लीलामध्ये तो रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत झळकला. त्यानंतर तो हर्षवर्धन कुलकर्णीच्या हंटरमध्ये राधिका आपटेसह चमकला. यात त्याने मंदार पोंक्षे या लैंगिक व्यसनी पुरुषाची भूमिका साकारली होती. त्यानंतर पुन्हा तो विवेक अग्निहोत्रीच्या जुनूनियत या चित्रपटात एनआरआयची भूमिका करताना दिसला. 2017 मध्ये त्याने कॅबरे, ए डेथ इन द गुंज आणि कँडीफ्लिप असे 3 चित्रपट आपल्या नावावर केले. मर्द को दर्द नही होता या अॅक्शन कॉमेडी चित्रपटात तो अनोख्या दुहेरी भूमिकेत वावरला. यासाठी त्याला स्क्रीन पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले. कमांडो 3 चित्रपटासह नेटफ्लिक्सच्या मूळ चित्रपट घोस्ट स्टोरीजमध्येही गुलशन देवय्या संस्मरणीय भूमिका करताना दिसला.

अभिनेता गुलशन देवेय्या

दहाड मिळालेले यश- सध्या अमेझॉन प्राईम व्हिडिओवर गुलशन देवय्या सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मासोबत दहाड या वेब सिरीजमध्ये दिसत आहे. यात तो देवी लाल सिंग ही इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहे. बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये दहाडचा प्रीमियर पार पडला होता. गेल्या काही आठवड्यापासून प्रमोशन केल्यानंतर ही मालिका प्रेक्षक पाहात आहेत व सोनाक्षी, गुलशन देवेय्या आणि विजय वर्माच्या कामाचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा -What A Coincidence : अनुष्का शर्मा आणि क्रिती सेनॉन एकाच दिवशी झळकल्या रिचर्ड क्विन गाऊनमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details