महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनुपम खेर यांनी 'द सिग्नेचर' या ५२५ व्या चित्रपटाचे शूटिंग केले पूर्ण

अनुपम खेर यांनी ( Anupam Kher ) त्यांच्या ५२५व्या चित्रपट 'द सिग्नेचर'चे ( The Signature ) शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाचे शूट पूर्ण झाल्याची घोषणा करताना खेर यांनी चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे. द सिग्नेचरचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ( Gajendra Ahire ) यांनी केले असून अनुपम खेर स्टुडिओने याची सहनिर्मिती केली आहे.

By

Published : Jun 20, 2022, 5:39 PM IST

अनुपम खेर
अनुपम खेर

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर ( Anupam Kher ) यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या आगामी 'द सिग्नेचर' ( The Signature ) चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे शूट पूर्ण झाल्याची घोषणा व चित्रपटातील फर्स्ट लूक अनुपम यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

"फर्स्ट लूक पोस्टर: के. सी. बोकाडिया निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'द सिग्नेचर' चित्रपटाचे शूटिंग आम्ही पूर्ण केले आहे हे सांगताना आनंद होत आहे. चित्रपटाची सह-निर्मिती अनुपम खेर स्टुडिओ महिमा चौधरी, रणवीर शौरी द्वारे केली आहे,'' असे 67 वर्षीय अनुपम खेर यांनी पोस्टला कॅप्शन दिले आहे.

"सामान्य माणसाची सुंदर कथा" म्हणून वर्णन केलेल्या 'द सिग्नेचर'चे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. नॉट ओन्ली मिसेस राऊत आणि द सायलेन्स या मराठी चित्रपटांसाठी गजेंद्र अहिरे ओळखले जातात. या चित्रपटाचे समर्थन प्रख्यात निर्माते के सी बोकाडिया यांनी केले आहे आणि अनुपम खेर स्टुडिओची सहनिर्मिती आहे. द सिग्नेचर हा खेर यांचा ५२५ वा चित्रपट आहे. अनुपम खेर आगामी 'उंचाई' या सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा -रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'शमशेरा' 22 जुलै रोजी होणार रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details