महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रावरंभा चित्रपटातून उलगडणार ऐतिहासिक प्रेमकहाणी!

रावरंभा - द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच आता सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा
रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा

By

Published : Mar 31, 2021, 11:53 AM IST

Updated : Aug 10, 2022, 1:06 PM IST

गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीत वाढ होऊ लागली आहे. हिंदीमध्ये ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी ने अभूतपूर्व यश मिळविले आणि मराठीमध्ये फतेहशिकस्त, हिरकणी सारख्या चित्रपटांनी ऐतिहासिक चित्रपटांना चालना दिली. मराठीमध्ये अजूनही बरेच ऐतिहासिक चित्रपट बनताहेत ज्यात आगामी रावरंभा देखील मोडतो. येत्या काळात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळतील.

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे रावरंभा - द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रावरंभा चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित रावरंभा हा चित्रपट सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. बेभान, झाला बोभाटा भिरकीट करंट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे.

रावरंभा या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच आता सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे या चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Last Updated : Aug 10, 2022, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details