मुंबई - बॉलिवूड स्टार आलिया भट्टने शनिवारी तिचे दिवंगत सासरे ऋषी कपूर यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्य त्यांचे स्मरण केले. आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर ऋषी यांचा फोटो शेअर करीत इमोजी टाकला आहे.
अलीकडेच रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकलेल्या आलियाने तिच्या पतीच्या वडिलांसोबत जवळचे नाते शेअर केले आहे. ऋषी आजूबाजूला असताना आलियाने कपूर कुटुंबासोबतचे अनेक प्रसंग शेअर केले आहेत. आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ऋषी, रणबीर आणि नीतू कपूरसोबत पोज देतानाचा फोटो शेअर केला आहे. या कौटुंबीक फोटोवर तिने हार्ट इमोटिकॉन देखील टाकला आहे.
ऋषी यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनीही त्यांच्या दिवंगत पतीची आठवण म्हणून एक भावूक पोस्ट लिहिली आहे. नीतू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'ऋषीजींना सोडून आज दोन वर्षे झाली आहेत... ४५ वर्षांचा जोडीदार गमावणे कठीण आणि वेदनादायी होते. मानसिकदृष्ट्या स्वतःला गुंतवून ठेवणे हाच त्यावेळी माझे हृदय बरे करण्याचा एकमेव मार्ग होता. चित्रपट आणि टेलिव्हिजनने माझी काळजी घेतली, ऋषीजी तुमची नेहमी आठवण राहील, तुम्ही नेहमीच सर्वांच्या हृदयात राहाल.''
ल्युकेमियाशी दोन वर्षांच्या लढाईनंतर दोन वर्षापूर्वी ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा -Rishi Kapoor Death Anniversary : ऋषी कपूर यांची ४५ वर्षांची साथ तुटल्याने नीतू कपूर यांना वेदना